कोणास ठावूक कसे, पण श्रेयाला आवडले हे गाणे....!
कधीही लागले कि असेल तिथून टिव्ही कडे बघायला लागते... डोळे नुसते लकाकतात तिचे...अगदी मनापासून आवडते तिला हे गाणे! त्यामुळे कधी कुरकुरत असली की मी टिव्ही चानेल्स बदलून हे गाणे शोधून लावते, लगेच शांत बसते पोरगी....!
असो. पण श्रेयाला DOCOMO ची जाहिरात आणि Flipkart ची जाहिरात पण खूप आवडते.. ज्या खरच smart जाहिराती आहेत...
कोणाला काय आवडेल हे सांगता येत नाही हेच खरे...