Friday, April 1, 2011

शिकणे एक अनुभव....!


शिकविणे ही एक कला आहे म्हणतात. दुसर्याला शिकविणे हे फार कठीण असते...! तरी पण डोक्यावर बसून, मारून मुटकून शिकविता येते.. जर शिकण्याची इच्छा असेल तरच.....!

शिकणे हा खरच एक अनुभव असतो.किंबहुना  कुठलीही गोष्ट शिकताना त्या मागची शिकण्याची दुर्दम्य इच्छा हीच खरी कारणीभूत असते. 

बालपणी गिरवलेली अक्षरे असोत किवा मोठेपणी शिकलेली गाडी चालवणे असो, प्रत्येक शिकणे वेगळे आहे. त्यातूनच माणूस घडत जातो, समृद्ध होत जातो. आणि ह्या शिकण्या मागे जर इच्छा असेल तर माणूस ते कधीच विसरत नाही. असे शिकणे शिकवणार्याला तापदायक न होता, दोघानाही आनंददायी होते. 

लहान मुले देखील मोठ्यांकडे पाहून शिकतात. सुरवातीला प्रत्येक गोष्टीत असलेली त्यांची उत्सुकता कधी इच्छामध्ये रुपांतरीत होते हे काळात नाही. ही इच्छा जर वाढीस लागली तर मुलांसाठी शिकणे हा एक अनुभव होऊ शकतो आणि असे वातावरण तयार, करणे, निर्माण करणे हे नक्कीच आपल्या हातात आहे, नाही का? 

No comments:

Post a Comment